तुळजापूर दि १८ प्रतिनिधी
गुजरात येथील अहमदाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. ए. सी. जोशी यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मंदिर कार्यालयातील कर्मचारी एस एस कदम उपस्थित होते.