तुळजापूर, दि. ९  

महाड , रायगड जिल्हा येथे स्वावलंबन फाऊंडेशनच्या वतीने देेेण्यात येणारे अष्टभुजा स्त्री सन्मान सोहळा - पर्व दुसरे २०२२  यंदाचा पुरस्कार तुळजापूर येथील सौ.अर्चना संजय गुरव यांना प्रदान करण्यात आले आहे. 

स्वावलंबन फाऊंडेशन अष्टभुजा स्त्री सन्मान सोहळा - पर्व दुसरे पुरस्कार वितरण सोहळ्याचे स्वावलंबन फाऊंडेशनचे अध्यक्ष  संजय पोवळे,  सचिव सौ विभा परब, महाड येथील  आमदार  भरतशेठ गोगावले, महाराष्ट्र मुख्य लिडर  सौ सोनाली कोदे, कोकण प्रभारी सचिव ममता बागेवाडी, खजिनदार  वनिता चव्हाण, मुख्य विश्वस्त  सौ. अर्चना हिंदळेकर, मुंबई मध्यवर्ती प्रांत अध्यक्ष  सौ. पूजा  इंदुलकर , पुणे प्रांत उपाध्यक्ष  सौ. अनुजा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या सौ निता शेट, डॉ, जागृती कांबळे, अडॅ  अंकिता डावरूक. श्रीमती शिला साबळे यांची उपस्थित होते. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य   जितेन्द्र सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


हा पुरस्कार देशातील विविध विभागांतील आठ महिलांना प्रदान करण्यात आला .सौ नूतन मिस्त्री (नाशिक), मीनाक्षी शिंदे(रायगड), सौ. अंजली ब्रम्हे(पुणे), मानसी वेदक(मुंबई), सौ. उज्वला सुकाळी(मुंबई), सौ. अर्चना संजय गुरव(तुळजापूर), सौ. गायत्री मराठे(पुणे), सौ. कोमल पारेख(पुणे) यांना प्रदान करण्यात आला.


निरपेक्ष भावनेने महिला सक्षमीकरणासाठी काम करणार्‍या महिलांना अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, शेला, आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  निमंत्रक मीनाक्षी शिंदे , कोकण जनसंपर्क प्रमुख आणि स्वावलंबन प्रशासन यांनी उत्तम रित्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.


फाउंडेशनचे सचिव सौ विभा परब यांनी अष्टभुजांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यशस्वीतेसाठी सबरिन ईसाने, अमृता पाथरे, श्रावणी मांडवकर, सौ पोर्णिमा जंगम. प्रिती देशमुख. जान्हवी राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.  सुत्रसचालन सौ मिलन निकम, स्मिता जोष्टे यांनी केले.
 
Top