वागदरी , दि. ०९ : एस.के.गायकवाड


उस्मानाबाद रिपब्लिकन पार्टी आँँफ इंडियाच्या वतीने दि.१० मे २०२२ रोजी जिल्ह्यातील  सर्व तहसील कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी  आंदोलन करण्यात येणार आसल्याची. माहिती जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी दिली.


  रीपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्य मंत्री  ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० मे २०२२ रोजी महाराष्ट्रात  राज्यभर सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर, प्रमोशनसाठी मागासवर्गीय कर्मचारी याना आरक्षण आसावे,गायरान जमीनवर अतिक्रमण करून कसून खाणाऱ्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमित करावे, भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीला पाच एकर जमीन द्यावी आदीसह विविध  मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.


  उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन करावे असे आवाहन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ व जिल्हा सरचिटणीस तानाजी क़दम यांनी केले आहे.
 
Top