तुळजापूर, दि.८
"ऊस शेती फायदेशीर करण्यासाठी शाश्वत पद्धतीने ऊस उत्पादनात वाढ करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मंगेश भास्कर यानी केले .
जवळगाव येथील आत्मोन्नति फाउंडेशन व श्रीवर्धन शुगर्स, काटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मोन्नति कृषि व वसुंधरा महोत्त्सव 2022 अंतर्गत शाश्वत ऊस उत्पादनवाढ़ कार्यशाळेमधे ते बोलत होते . मोठ्या संख्येने ऊसउत्पादक शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की , "शाश्त्रोक्त पद्धतीने व नवनवीन तंत्रदन्यांचा वापर केल्यास प्रति एकर 100 टन ऊस उत्पादनात वाढ करणे सहज शक्य आहे, याकामी दहा ड्रम कृषि तंत्र ची मदत होउ शकते.
या महोत्सवाचे उद्घाटन वसुंधरेचे संवर्धन संदेश देण्यासाठी तुळशी पूजनाने झाले. मान्यवरांचे स्वागत आत्मोन्नति नुट्रिशन बास्केट देऊन करण्यात आले . महोत्सवाचे उद्घाटन बब्रुवान उर्फ काकासाहेब माने देशमुख चेअरमन जय हिंद शुगर लिमिटेड यांचे हस्ते झाले.
सदर महोत्स्वामधे योग प्रत्यक्षीके , शाश्वत विकास कार्यशाला व पर्यावरण संवर्धन प्रबोधन असे विविध उपक्रम आयोजित केले होते. त्याअंतर्गत शाश्वत ऊस उत्पादन वाढ कार्यशाला आयोजित केली होती. आत्मोन्नति फाउंडेशन योग व शाश्वत कृषी तंत्रज्ञान माध्यमातून पर्यावरण, ग्रामविकास व शेतकरी सक्षमीकरण याबाबत कार्य करणार आहे.या प्रसंगी अंबिका योग कुटीर ठाणे शाखा वैराग यांचे वतीने शेतकर्यांना उत्तम योगासने करून योगाचे महत्व सांगितले.
यावेळी व्हाईस चेअरमन नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज रांजणी कळंब , पांडुरंग आव्हाड, मुख्य शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर डॉ. ल. रा. तांबडे, श्री सिद्धिविनायक परिवार प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी यानी संयोजकांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाला आयोजित केलयबद्द्ल अभिनंदन केले व आक्टोबर २०२२ मधे सुरु होणाऱ्या श्रीवर्धन शुगर्स या गुळ पावडर/सल्फरमुक्त साखर प्रकल्पास शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी श्रीवर्धन शुगर्स चे औदुंबर डिसले , डॉ स्वप्निल पाटील , नाना कदम व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक पृथ्वीराज पाटील व सूत्रसंचलन सुहास ढेकने यानी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग गांधले , श्री गव्हाणे , अशोक पाटील ,परमेश्वर कापसे , चंद्रकांत डिसले , तुकाराम डिसले ,महेश नागटिळक, संतोष चव्हाण , नौशाद शेख , उत्कर्ष डुरे , मनोज शिंगनाथ , शंकर डांगे , राहुल बेदरे, रामभाऊ जोगदंड ,शंकर जमदाडे यांनी प्रयत्न केले. या कार्यशाळेत तुळजापूर, उस्मानाबाद, बार्शी , सोलापूर भागातील शेतकरी उपस्थित होते.