नळदुर्ग , दि . ०८
गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या, एस.बी.आय.बँके समोरील विद्युत डी. पी.वाहतुकीस अडथळा ठरत आहे. याप्रकरणी मनसेने सतत पाठपुरावा केल्यामुळे ही डिपी हलविणार असल्याचे मनसेचे प्रमोद कुलकर्णी यानी बोलताना सांगितले.
या डिपी मुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ही डी. पी.तात्काळ हटवून इतरत्र स्थलांतरित करावे यासाठी मनसेने दोन वेळा निवेदन देऊन सातत्याने नळदुर्ग महावितरणचे साहय्यक अभियंता यांच्याशी चर्चा करत पर्यायी जागा दर्शविली,व तसेच विरिष्ठ अभियंता यांची मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके, मनविसे शहर सचिव आवेज ईनामदार यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेऊन व फोन वर सातत्याने याबाबत चर्चा करून पाठपुरावा सुरुच ठेवला. महावितरणला याबाबतचे गांभीर्य समजले व महावितरणने येत्या आठवड्यात ही विद्युत डी.पी हटविन्यात येईल असा शब्द साहय्यक आभियंता गायकवाड़ यांनी चर्चे दरम्यान मनसेच्या पदाधिका-यांना दिला आहे. यामुळे आता वाहतुकीची कोंडी होणार नाही व वाहनधारकाची तारेवरची कसरत थांबणार असल्याने मनसेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.