नळदुर्ग ,दि . १२


हार तुरे,केक,बॅनर असा कोणताही प्रकार न करता मुलाच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुली व संस्थांना एक लाखाचा मदत निधी देऊन खोगरे कुटुंबीयांनी समाजासमोर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठेवल्याचे  प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते  श्रमिक पोतदार यांनी केले.


शिवछत्रपती खेल पुरस्कार विजेते,निवृत्त आदर्श मुख्याध्यापक  शाहूराज खोगरे,सौ.सुशीला खोगरे यांचे नातू व आयकर विभागात उपायुक्त असलेले डॉ. रविराज व डॉ. चेतना यांचा मुलगा चि. अनंत यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त रामतीर्थ, नळदुर्ग येथे  वात्सल्य सामाजिक संस्थेच्या सहयोगाने सदरील कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी वडिलांचे छत्र हरवलेली,पीपल्स ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेती प्रणिता पवार, क्षमता असतानाही आर्थिक विवंचनेमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करू न शकणारी शुभांगी बिराजदार, एकल पालक असलेली राणी शिंदे व कृष्णा शिंदे या भावंडांच्या शिक्षणासाठी,शेतीच्या नापिकीपणामुळे कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी सोमनाथ माळगे यांच्या कुटुंबियांसाठी,पर्यावरण रक्षण व दुष्काळ निवारण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे रोहित,रक्षीता या बहीण भावांच्या संस्थेसाठी,अपघातात मयत झालेले जिलानी बागवान यांच्या मुलींच्या वैद्यकीय उपचारासाठी,नळदुर्ग शहरात सामाजिक कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आरंभ सामाजिक संस्थेत,अपघातात पाय गमावलेल्या महालिंग गायकवाड या अपंग व्यक्तीस वरीलप्रमाने  प्रत्येकी दहा हजार रुपये असे मिळुन एक लाखाचा निधी वितरित करण्यात आला.

यावेळी रामतीर्थ देवस्थानचे श्री.शुक्ला महाराज, पञकार  विलास येडगे, ॲड.धनंजय धरणे,  विशाल डुकरे , चांद शेख, प्रशांत सोमवंशी,  लक्ष्मण दुपारगुडे, अच्युत कापसे, लतीफ शेख, रोहित मोटे, लखन भोसले, सागर हजारे,  अभिषेक सुरवसे व वात्सल्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top