तुळजापूर, दि. ११ :

 छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश न  दिल्याबद्दल तुळजापुरातील सर्व राजकीय पक्ष, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि विविध संघटनेच्या वतीने गुरुवारी तुळजापूर बंदची हाक दिली होती त्यास उत्सर्फुत  प्रतिसाद मिळाला .  शहरातील सर्व व्यवहार दिवसभर  बंद असल्याचे दिसुन आले.

छत्रपती संभाजी राजे दि. ९ मे रोजी रात्री श्री  तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी  मंदिर प्रशासनाकडून त्यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक भूमिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या निर्णयानंतर मंदिर प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मात्र मराठा क्रांती ठोक मोर्चाने तहसीलदार  व धार्मिक व्यवस्थापक  यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करून तुळजापूर बंदची हाक दिली होती


पहाटे पासून तुळजापूर शहर सायंकाळपर्यंत कडकडीत बंद होते. बाहेर गावाहुन येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. या भाविकांना सुरळीतपणे दर्शन देण्यात आले. त्यानंतर शहरातील सामाजिक संस्था आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने अल्पोपहार आणि थंड पाण्याच्या पिण्याची व्यवस्था मंदिर परिसर आणि कमान वेस, बस स्थानक परिसर येथे करण्यात आली होती. बस स्थानक परिसर उस्मानाबाद रोड, नळदुर्ग रोड ,आंबेडकर चौक, भवानी रोड मंगळवार पेठ' शुक्रवार पेठ, साळुंके गल्ली ,आर्य चौक या प्रमुख बाजारपेठेसह शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद असल्याचे दिसुन आली.


गोकुळ शिंदे, ॲड धीरज पाटील, किशोर गंगणे, नितीन शिंदे, महेश चोपदार, महेश गवळी, अजय साळुंखे, प्रशांत सोनजी, अर्जुन साळुंखे, गोरक्ष पवार, सागर इंगळे, ओम मगर, संकेत कदम, योगेश रोचकरी, महेश नंदीबुवा अंबुलगे, मकरंद प्रयाग, भालचंद्र पाठक, विजय भोसले ,अमोल भोसले, पुष्कराज पलंगे, भुजंग मुकेरकर, अक्षय साळवे, विशाल साळुंखे, ऋषिकेश साळुंखे, महेश अमृतराव, प्रकाश काळे , राहुल कदम, तानाजी कदम, सतीश कदम आदीच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसिलदार सौदागर तांदळे यांना दिले. या निवेदनामध्ये तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा  इशारा देण्यात आला आहे. या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून पाठिंबा देण्यात आला. पार्टीच्या वतीने तानाजी कदम, प्रकाश कदम, अरुण कदम, शरद कदम, बाबासाहेब मस्के यांनी  निवेदन दिले.
 
Top