तुळजापूर ,दि . १२
दि. 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो, त्यानिमित्ताने उपजिल्हा रूग्णालय तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानीच्या प्रतिमेचे व आरोग्य देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन रूग्णालयातील सर्व अधिपरिचारीका व परिचारिका तसेच ब्रदर्स आणि सेवक यांचा सत्कार करण्यात आला, "उपजिल्हा रूग्णालयातील सर्वच डाॅक्टर व सिस्टर यांचे कोविड काळातील काम हे प्रशंसनीय आहे.
सर्वसामान्य माणसांचा रुग्णालय वरील आस्था आणि विश्वास दृढ झाला आहे,हि रुग्ण सेवा अशीच अविरत रहावी अशी अपेक्षा आहे" असे बोलताना रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी सांगितले,
रुग्णालय अधिक्षक डॉ.राहुल वाघमारे, डॉ. श्रीधर जाधव, डॉ पाटील,अधिसेविका
भोसले एस. डी, अधिपरिचारीका गावडे के., निकम एस.,भड एस. वरपे सिस्टर, क्षिरसागर एस,पेंदे सिस्टर,लोंढे आर.,काजवेकर सिस्टर, व सर्व परिचारिका, जाधव,बनसोडे ,पवार गायकवाड ब्रदर्स उपस्थित होते.