जळकोट,दि.४ :
लोहारा तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणेआरोग्य सेवा पुरवणारे डॉ. हेमंत श्रीगीरे व डॉ. रूपाली श्रीगीरे यांचे चिरंजीव शिवम श्रीगीरे यांचा एमबीबीएसला नंबर लागला आहे. शिवम याने आपले माता पिता आणि स्वतःचे स्वप्न साकार केल्यामुळे शिवमचा धनगर समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला या वेळी यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय घोडके, डॉ.हेमंत श्रीगीरे,डॉ.रुपाली श्रीगीरे , बालाजी सोनटक्के, खंडू सोनटक्के आदीजन उपस्थित होते.