नळदुर्ग ,दि . ०४

नळदुर्ग शहरात जगतज्योती  महात्मा बसवेश्वर जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.


 शहारातील मल्लिकार्जुन मंदिरात मंगळवार   दि,३ मे रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या  जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या  प्रतिमेचे पुजन  प्रतिष्ठित व्यापारी वैजिनाथ कोरे यांच्या हास्ते करण्यात आले. त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर जयंती  व गुरुवर्य श्री बसवराज महास्वामीजी यांच्या प्रकटदिनाचे औचित्य साधुन चावडी चौकात पाणपोईचा शुभारंभ प्रतिष्ठित नागरिक दयानंद स्वामी यांच्या हास्ते करण्यात आला.

नगरसेवक बसवराज धरणे, महालिंग  स्वामी , ॲड अरविंद बेडगे , माजी नगरसेवक  सुधीर हजारे ,  वैजिनाथ कोरे , सुभाष कोरे , दयानंद स्वामी ,  शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बंडू कसेकर , कोप्पा पाटील , ज्योती बचाटे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले ,   प्रकाश स्वामी महाराज ,  मनसेचे जिल्हा  सरचिटणिस  ज्योतीबा येडगे, प्रमोद कुलकर्णी , ओंमकार कलशेट्टी ,   सुभाष बुटे , काशिनाथ कलशेट्टी , गुरुनाथ मुळे , सागर कलशेट्टी ,मल्लु शिरगुरे, ओंमकार शिरगुरे ,  विजय शिरगुरे , महादेव हात्ते , आप्पी स्वामी , सचिन बेडगे ,नळदुर्ग  शहर पञकार  संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे , जेष्ठ पञकार  विलास येडगे , शिवाजी नाईक , उत्तम बणजगोळे , अजित चव्हाण ,सुनिल गव्हाणे , तानाजी जाधव  आदी उपस्थित होते.

 
Top