तुळजापूर  दि २३ डॉ. सतीश महामुनी

कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये बंद करण्यात आलेले तुळजाभवानी देवीचे दही दुधाचे अभिषेक पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय श्री तुळजाभवानी मंदिर विश्वस्तांनी घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून मिळाली आहे. 
अनेक संघटना आणि पुजारी मंडळाकडून अभिषेक पूजा सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली होती याविषयी लाक्षणिक धरणे आंदोलन देखील करण्यात आले होते.


तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्यावतीने रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार तुळजाभवानी देवीचे सकाळी होणारे अभिषेक सुरू करण्यात आलेली आहे सकाळी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत देवीचे अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळच्या दुष्काळाबाबत अद्याप निर्णय न झाल्याचे दिसून येत आहे. कुलधर्म कुलाचार करण्याच्या अनुषंगाने अभिषेक पूजा महत्त्वाची असून ती बंद असल्यामुळे हजारो भाविक भक्तांचे यादरम्यान अडचण झाली होती मंदिर प्रशासनाने अभिषेक पूजा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भावीक भक्ताना पुन्हा तुळजाभवानीची अभिषेक पूजा करता येणार आहे.


मंदिर संस्थानच्या वतीने अधिकृतपणे जाहीर प्रगटन प्रसिद्धी देत असताना अभिषेक करण्याबाबत पुरातत्व खात्याच्या सूचना आणि न्यायालय निर्णय यांचे अनुपालन करण्याबरोबर मूर्तीची होणारी झीज याविषयीचा मुद्दा उपस्थित करून या महत्त्वाच्या विषयावर शासनाकडून मंदिर संस्थांना मार्गदर्शन प्रलंबित आहे असे म्हटले आहे या अभिषेक तुझे मध्ये उपयोगात आणले जाणारे दही आणि दूध यामध्ये कोणतीही भेसळ असू नये शुद्ध दही दुधाचा उपयोग करावा अशी सूचना केली आहे. यामध्ये मूळ मूर्तीवर अभिषेक करावा किंवा कसे असेदेखील जाहीर प्रगटन आत नमूद केले आहेत या विषयाच्या अनुषंगाने पुरातत्त्व खात्याचे मार्गदर्शन,  न्यायालय निर्णय, व शासनाकडून करण्यात येणाऱ्या नवीन मार्गदर्शक सूचना या बाबींचा जाहीर प्रगटन यामध्ये उल्लेख केलेला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहावर झाली आणि तेथे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरा मंदिर संस्थांकडून जाहीर प्रगटन प्रकाशित करण्यात आले आहे

अभिषेक सुरू झाल्याची बातमी मिळाल्यानंतर श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांना मंदिर संस्थानच्या या निर्णयाची वर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की केवळ सकाळचे अभिषेक सुरू करण्यात आले आहेत आमच्या मागणीनुसार सायंकाळचे अभिषेक आणि सिंहासन महापूजा देखील तात्काळ या निर्णयामुळे बरोबर सुरू झाली पाहिजे. सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आवश्यक चालले पाहिजेत अशी मागणी देखील त्यांनी या प्रसंगी केली. खूप मोठ्या संख्येने अभिषेक महापूजा करण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी आहे हे लक्षात घेऊन मंदिर संस्थांनी अभिषेक पूजेचे नियोजन करावे केवळ सकाळची नियोजन करून भाविकांच्या पूजा होणार नाही यासाठी सायंकाळच्या देखील अभिषेकाला सुरुवात करावी असा मुद्दा पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे उपस्थित केला आहे.
 
Top