अणदूर ,दि. २०

. तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी काँग्रेसचे आमोल नरवडे तर व्हाईस  चेअरमन पदी गुरुनाथ कबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .



सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित जय हनुमान शेतकरी विकास पॅनल व शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनल मध्ये सरळ सरळ निवडणूक लागली होती या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला धूळ चारुन काँग्रेस प्रणित जय हनुमान पॅनलने १३ जागेवर विजय संपादन केले असल्याने सोसायटीवर काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे .

राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रणित जय हनुमान शेतकरी विकास पॅनलने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते जय हनुमान शेतकरी पॅनलचे पॅनल प्रमुख शरणाप्पा कबाडे , अमर नरवडे , बापु बोंगरगे यांनी विजय संपादन करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत .

रविवारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी खुदावाडी  नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली . चेअरमन पदासाठी अमोल नरवडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी गुरुनाथ कबाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी चेअरमन पदी अमोल नरवडे  तर व्हाईस चेअरमन पदी गुरुनाथ कबाडे  यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी बोलताना नूतन चेअरमन अमोल नरवडे म्हणाले की, खुदावाडी मधील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करूत,एक आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करूत असा आशावाद बोलून दाखवला .या दोन्ही पदाच्या निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा करून नतुन चेअरमन व्हाईस चेअरमन व नूतन संचालकांचे जंगी सत्कार करण्यात आले यावेळी नूतन संचालक  अहंकारी लक्ष्मण ,जाधव काशिनाथ,जवळगे शिवप्पा ,काटे भानुदास ,मोळगड्डे भीमराव , स्वामी नागनाथ, घोडके दत्तात्रय , कबाडे अंजिरबाई , कांचन सातलिंग स्वामी , कापसे श्रीदेवी  , सुनिता भालेराव  सोसायटीचे सचिव कदम आदीसह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top