काटी , दि . २२ 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील त्र्यंबकेश्वर बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष खंडेराव जाधव तसेच पर्यवेक्षक गणेश त्र्यंबक हलकरे हे नुकतेच प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.या दोघांचाही सेवापूर्ती सत्कार समारंभ शनिवारी दि.25 रोजी सकाळी 11 वाजता सरस्वती मंगल कार्यालय, तामलवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे हे असून अध्यक्षपदी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हे असणार आहेत.शिक्षणाधिकारी गजानन सुसर, गटशिक्षणाधिकारी अर्जून जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.असे त्र्यंबकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवणप्पा चंद्रकांत मसूते, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंत लोंढे आणि नूतन मुख्याध्यापक सुहास दादाराव वडणे यांनी कळविले आहे.
 
Top