मुरूम, ता. उमरगा, दि. २३ : 


येथील वनश्री बहुउद्देशीय संस्था, दस्तापूर संचलित ज्ञानदान विद्यालय, मुरूमच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयात मंगळवारी (ता. २१) रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. 


या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डॉ. महेश मोटे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी पी. जी. मदने होते. यावेळी डॉ. अमर गडदे, पत्रकार महेश निंबरगे, राम डोंगरे, योगेश पांचाळ, मुख्याध्यापक जी. एम. कुंभार, विजय इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. महेश मोटे यांचा यथोचित विशेष सत्कार करण्यात आला. कुमारी शरयू बिरादार, ऋतुजा वागदरे, वेदांत इंगळे, हणमंत माने, आकाश डोंगरे, दिपक ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 

यावेळी डॉ. महेश मोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश प्राप्त करण्याकरिता कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला पाहिजे. वाचन, चिंतन व मनन या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या पाहिजेत. अध्यक्षीय समारोप प्रसंगी पी. जी. मदने यांनी विद्यालयाच्या सलग तीन वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा राखल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करुन अभिनंदन केले. सहशिक्षक सतिश बिराजदार, विजयकुमार फुगटे, विश्वनाथ जोशी, श्रीमती मंजुषा गायकवाड, प्रकाश रोडगे, विठ्ठल गुगे, प्रविण शिंदे, अंबादास मंडले आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरप्पा कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन सुधाकर म्हेत्रे तर आभार शिवानंद बोलदे यांनी मानले. यावेळी माता-पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी  उपस्थित होत्या.
 
Top