मुरुम, ता. उमरगा, दि. २३ :
भारत शिक्षण संस्था, उमरगा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम येथे आयोजित बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुवारी (ता.२३) रोजी पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सहशिक्षिका डॉ. वंदना जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबक बाबा इंगोले होते. यावेळी तानाजी भाऊ फुगटे, प्राचार्य दिलीप इंगोले, प्रा. विजया बेलकेरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी तिन्ही शाखेतून आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकातील विज्ञान शाखेतून कु. माने अपर्णा प्रवीण, काळे शिवानी महावीर, इंगोले मेनका माधव, कला शाखेतून कु. भाकरे रत्नमाला शिवपुत्र, अचलेरे सुषमा संतोष, शिंदे प्रज्ञा राम तर वाणिज्य शाखेतून कु. सुर्यवंशी सुष्मिता रमाकांत, मडोळे ऐश्वर्या विश्वनाथ, इनामदार बुशरा सलीम आदी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.