काटी , दि . २३ : उमाजी गायकवाड
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कारखान्याच्या वतीने सि.एस.आर. फंडातुन शैक्षणिक साहीत्याचे वितरण व ऑक्सीजन कॉन्सस्टेटर मशीचा लोकार्पन सोहळा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या हस्ते बुधवार दि. (22) रोजी संपन्न झाला.
बालाजी अमाईन्स कारखान्याच्या आवारात आयोजित केलेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर होते तर मुख्य कार्यकारी राहूल गुप्ता बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, राजेश्वर रेड्डी, तहसिलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांत सिह मरोड, सी.एस.आर.विभाग प्रमुख एम. ए.बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याच्या सी.एस.आर. फंडातुन 10 शाळांना शैक्षणिक साहीत्य व आरोग्य विभागास 12 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर उपकरणाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम रेड्डी यांनी केले
यावेळी सरपंच मंगलताई गवळी, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, गट शिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, तलाठी राजमाने, केन्द्र प्रमुख एल.आर. धोंगडे, बालाजी चुंगे, कारखान्याचे समन्वयक दत्तप्रसाद सांजेकर, सचिन राऊत, विनोद चुंगे, ज्ञानेश्वर घोटकर, मारुती सावंत, मुख्याध्यापक सुहास वडणे, राजाराम वाघमारे, महादेव वाघमारे, सोमदेव गोरे यांच्यासह तामलवाडी परिसरातील शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
या शाळांना झाली मदत
बालाजी अमाइन्स कारखान्याने शिक्षण व आरोग्य विभागास मदत देण्यासाठी पुढाकार घेतला असून बुधवारी जि.प.शाळा तामलवाडी, जि.प. शाळा जळकोट,जि.प.शाळा केशेगाव, हंगरगेकर माध्यमिक विद्यालय तुळजापुर, माध्यमिक विद्यालय येवती, जि.प. शाळा खुदावाडी, जि.प. शाळा जळकोट, सिद्धेश्वर विद्यालय किलज,भारत विद्यालय उस्मानाबाद, जि.प.शाळा वागदरी, जि.प. शाळा वाल्हा, ता.भुम या शाळाना विविध साहीत्याचे वितरण उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.