काटी , दि .२३

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांनी नुकताच तामलवाडी शाखेच्या शाखाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.


 त्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते हणमंत गवळी, धोत्रीचे राम मस्के, पांडागळे आदींच्या वतीने शाल, फेटा, पुष्पहार घालून सत्कार करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांची साखर पेठ, सोलापूर येथून तामलवाडी शाखेच्या शाखाधिकारीपदी पदभार स्वीकारला आहे.
     

यावेळी पीक कर्ज आणि बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचा लाभ कसा मिळेल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सत्काराला उत्तर देताना नुतन शाखाधिकारी कृष्णा भोजा यांनी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
      
 
Top