काटी , दि . २४:
तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा येथे अवैध हातभट्टी अड्यावर तामलवाडी पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी तामलवाडी पोलीस पथकाने छापा टाकला. या कार्यवाहीत 70 हजार आठशे रुपयांचे अवैध दारु व रसायन नष्ट केले असून दोन आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील लमाण तांडा शेत शिवार येथे अवैध गावठी दारू निर्मिती होत असल्याची माहिती तामलवाडी पोलीस पथकाला मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार तामलवाडी पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्यासह पोलीस अंमलदार आनंद गायकवाड, आकाश सुरणर, करीम शेख, शिवाजी सिरसाट,नजीर बागवान,महीला पोलीस अंमलदार निचलकर या पोलीस पथकाने गुरुवारी 11 ते 2 वाजता राजु गुरप्पा राठोड व राजु धोंडीराम राठोड यांच्या शेताजवळील बांधाजवळ या दोन्ही ठिकाणी अचानक छापा मारला असाता 70 हजार 800 रुपये किंमतीचे हातभट्टी दारू व रसायन नष्ट केले.
याप्रकरणी पोलिसांनी हातभट्टी चालक चंद्रकांत भिमा चव्हाण रा. खडकी तांडा ता. तुळजापूर आणि विजय मानसिंग चव्हाण रा. बक्षी हिप्परगा ता. उत्तर सोलापूर, या दोघाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा कलम 65(इ), 65(फ) नुसार तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक संजय राठोड हे करीत आहेत.