वागदरी, दि. १६ : एस.के.गायकवाड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात शाळा पूर्व तयारी मेळावा घेऊन शालेय विद्यार्थ्यांना पाट्यपुस्काचे वाटप करून व इयत्ता पहिलीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे गूलाब पुष्पाने स्वागत करून त्यांची गावातून चारचाकी वाहानातुन मिरवणूक काढून शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
उन्हाळी सुट्टीच्या नंतर बुधवार दि.१५ जून २०२२ रोजी जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे शाळा सुरू करण्यात आली. सुट्टी नंतर शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी व आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्मान व्हावी या उद्देशाने सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत करून मुख्याध्यापिका महादेवी जते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा पूर्व तयारी मेळावा घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाट्यपुस्काचे वाटप करण्यात आले. इ.पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांची गावातून मोटार कारमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
मध्यांन भोजनात गोडपदार्थ देण्यात आले.याप्रसंगी पहिलीच्या सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प,लेखन साहित्य, आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.यामुळे गावात आनंदी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामसिंग परिहार, ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरवसे, पालक विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, रामसिंग चव्हाण ,धुमाळ, भाग्यश्री बिराजदार, सविता पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनी पवार, मदतनीस दिपाली जाधव, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते , सहशिक्षक किसन जावळे, तानाजी लोहारा,सशिक्षिका एम.एम. चौधरी,आर.पी.साखरे आदीसह विद्यार्थी पालक उपस्थित होते.