नळदुर्ग ,दि.२९:

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर व उस्मानाबाद शहराचे नामकरण धाराशिव करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर नळदुर्ग येथील युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख  ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह शिवसेनेच्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात आनंदोत्सव साजरा करत भगव्या गुलालाची उधळण करत फटाके फोडून साखर वाटप करत महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. 


यावेळी युवा माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजयुमोचे जिल्हा  सरचिटणिस श्रमिक पोतदार, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, सागर हजारी, सुनील गव्हाणे, जमन ठाकूर, अजय ठाकूर,  चंद्रकांत घोडके,  गणेश गायकवाड, आनंद  बताले , बाळासाहेब वाघमारे, संतोष पाटील आदिसह नागरिक उपस्थित होते.
 
Top