नळदुर्ग ,दि .०३


वीर योध्दा महाराणा प्रतापसिंह यांची जयंती नळदुर्ग येथे उत्साहात साजरी करण्यात आली.  

 नळदुर्ग येथील महाराणा प्रताप चौक, माऊली नगर व शास्त्री चौक येथे वीर शिरोमनी महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


यावेळी नगरसेवक उदय  जगदाळे , नितीन कासार, बसवराज धरणे, विनायक अहंकारी, माजी नगरसेवक सुधीर हजारी,   भाजपाचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सरदारसिंग ठाकूर, आरंभ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारी, सागरसिंह हजारी, सामाजिक कार्यकर्ते  संजय विठ्ठल जाधव, गिट्टू हजारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, विलास येडगे, तानाजी जधव, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, शशिकांत कुलकर्णी, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बंडू कसेकर, प्रतापसिंह हजारी, गोलू हजारी, सौरभ गहिरवार, अक्षय हजारी आदीसह  सर्वपक्षीय पदाधिकारी व राजपूत समाज सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
 
Top