नळदुर्ग, दि . ०३

नळदुर्ग शहर व परिसरातील ५० पेक्षा आधिक गावक-यांचे लक्ष लागलेल्या नळदुर्ग येथिल उपजिल्हा रुग्णालय दि . ३ जुन पासुन  सर्व आरोग्य सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली.


येथील उपजिल्हारुग्णालय सुरु होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकड़े वेळोवेळी पत्रव्यवहार केला .त्याचबरोबर आक्रमकपणे पाच आंदोलने केली ,त्याचबरोबर  याठिकाणी डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु होऊन आरोग्य सेवा सुरु झाली.त्यानंतर मनसेने संबधिताकड़े पाठवपुरावा सुरुच ठेवत रुग्णालया बाबतचा विषय लावून धरल्याने  दि. ०३ जुन रोजी पासून उपजिल्हारुग्णालयात  काही प्रमाणात आरोग्य सुविधा सुरु झाल्या,व जवळपास सर्व आरोग्य विषयक सुविधा या आठवड्यात सुरु होतील. 


यामध्ये अपघातग्रस्ताना उपचार, ईसीजी,एक्स-रे,ऑपरेशन,प्रसूतिगृह या ठिकाणी सुरु होणार आहे,असे वैद्यकीय अधीक्षक  मुल्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांना बोलताना सांगितले. 


यावेळी मनसे पदाधिका-यांनी आरोग्याबाबत ज्या सुविधा दिल्या जाणार आहेत,त्याची पाहणी केली,व उर्वरित ईतर  सुविधा आठवड्यात सुरु होणार आहेत,त्याबाबत माहिती घेऊन चर्चा केली, यावेळी वैद्यकीय अधिक्षक  मुल्ला,वैद्यकीय अधिकारी,सर्व स्टाफ,नर्स,मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड,पत्रकार अजित चव्हाण,दिलीप राठोड आदि उपस्थित होते.
 
Top