काटी, दि . २१
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा रत्नागिरीचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ डॉ.अतुल ढगे हे सह्याद्री वाहिनीवर बुधवार दि.22 रोजी 12 ते 1 च्या दरम्यान व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
व्यसनाधीनतेची समस्या वरचेवर वाढत चालली आहे. दारू, तंबाखू या नशेसोबतच आतां चरस गांजा आदीमुळे संपूर्ण समाज या व्यसनाने पोखरत चालला आहे. किशोर वयीन मुले Whitener, Eraze-x या अशा गोष्टींची नशा करते तर तरूण पिढी चरस, गांजा सोबतच दारू, सिगारेट यात रमले आहे. त्यामुळे त्यांचे वैयकक्तित नुकसान तर होतच आहे, परंतु सोबतच त्यांचे कुटुंबाचे समाजाचे व पर्यायानी देशाचे नुकसान होत आहे.
देश वाचवायचा असेल, तर तरूण पिढीला वाचवायला हवे त्यांना व्यसनापासून रोखायला हवे. त्यासाठी खुप मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. व्यसनाधीनता, तो आजार आहे त्यांचे परिणाम काय होतात, ते त्यापासून दुर कसे रहावे या सर्व गोष्टी विषयी किशोरवयीन मुलांना जागृत करणे, माहिती करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सोबतच भारतातील विविध राज्यातील तब्बल 500 मनोविकारतज्ञ ‘गाव तिथे मानसोपचार’ च्या चौथ्या टप्यात ‘नशा मुक्त भारत, स्वस्थ भारत' या घोष वाक्यासह किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेच्या आजाराविषयी दि.26 जून ते 31 जुलै दरम्यान जनजागृती करणार आहेत. त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून तसेच दुरदर्शनचे प्रदिप दळवी व सुहास विद्वांस यांच्या संकल्पनेतून 26 जुन च्या आंतराष्ट्रिय मादक पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘डॉक्टर स्पीक ईन आरोग्य सपंदा’ या कार्यक्रमा अंतर्गत ‘नशामुक्त भारत, स्वस्थ भारत’ याविषयी म्हणजेच व्यसनाधीनता व ड्रग्ज विषयी चर्चा केली जाणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये तज्ञ म्हणून रत्नागिरीचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ डॉ.अतुल ढगे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर दुरदर्शन मुंबईच्या सुचेता गरूडे याचे सुत्र-संचालन करणार आहेत. दि 22 जुन रोजी (बुधवारी) दुपारी 12 ते 1 दरम्यान या कार्यक्रमाचे दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रक्षेपण होणार आहे.
डॉ अतुल ढगे हे मूळचे उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील काटी गावचे सुपुत्र आहेत. त्यांचे शिक्षण काटीच्या जिल्हा परिषद शाळेतून तसेच तुळजापूर च्या जवाहर नवोदय विद्यालय या शाळेतून झालेले आहे. एमबीबीएस नंतर त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध सायन हॉस्पिटल येथून मनोविकार तज्ञ म्हणून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनंतर त्यांनी प्रादेशिक मनोरूग्णालय रत्नागिरी येथे मनोविकारतज्ञ म्हणून सेवा केली तसेच स्वतःचे माइंडकेअर हॉस्पिटल चालू केले.
महराष्ट्रभरात प्रक्षेपण होणाऱ्या आकशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना तज्ञ म्हणून बोलावले गेले आहे.
काटी व तुळजापूरच्या ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक केले जात आहेत. त्यांच्याशी संपर्क केले असता थोड्याच दिवसात आपल्या भागातील लोकांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी महिन्यातून एक वेळा सेवा देण्याचा मानस असल्याचे सांगितले.
सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच जर व्यसनाधीनतेविषयी काही प्रश्न विचारायचे असल्यास 022-24988050 किंवा 24908050 या नंबरवर कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारायचे आवाहन डॉ. अतुल ढगे यांनी केले आहे.