तुळजापूर, दि.२१,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर, तुळजाभवानी शिक्षण शास्त्र महाविद्यालय तसेच विठ्ठल रामजी शिंदे विद्यालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात तुळजाभवानी महाविद्यालच्या प्रांगणात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये मानवाचे शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या भारत देशाने संपूर्ण जगाला योगामृत प्रदान केले असल्याचे मत तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी व्यक्त केले, यावेळी शिक्षणमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक आदटराव एल एल यांनी या योगदीनाचे योगा शिक्षक म्हणून नेतृत्व केले.
कार्यक्रमाप्रसंगी एन सी सी विभागप्रमुख डॉ मेजर वाय ए डोके, सुभेदार दिलीप शेंडगे, प्राचार्य दौंड, मुख्याध्यापक एलगुंडे, पर्यवेक्षक काशिद तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण,प्रा.डॉ.एम.आर आडे ,प्रा.आशपाक आतार यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे यांनी केले, यावेळी तिन्ही संकुलातील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.