मुरूम , दि . १६ :

उमरगा तालुक्यातील बेळंब येथील  विविध कार्यकारी सेवा सहकारी  सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. 

 नवनिर्वाचित  चेअरमन निवड करण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून पी. सी . सुनापे ,विविध कार्यकारी सोसायटी सचिव पंडित राठोड यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

 ही निवडणूक  शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे याच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवडणूक करण्यात आली.  नवनिर्वाचित  चेअरमन म्हणून विजयकुमार मगी,व्हाईस चेअरमन प्रभाकर भंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून बसवराज वरनाळे, काशिनाथ बोकडे,अनाप्पा शेवाळकर,सुधाकर बाबशेट्टी,वीरभद्र वाडीकर,मल्लिनाथ रामशेट्टी, व्हनप्पा घोडके,पंडित गुरव,अमृत पाटील,श्रीमती कमळाबाई कारभारी,सौ विजयालक्ष्मी येलगुंदे यांचा बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी मावळते चेअरमन श्रीकांत कारभारी,व्हा. चेअरमन धुळप्पा पाटील,गावातील प्रतिष्ठित  नागरिक  कलेश्वर येलगुंदे,सूर्यकांत दूधभाते,शरण बाबुराव पाटील,माजी सरपंच अशोक कांबळे, मौलाली नदाफ,वसंत करके,शब्बीर नदाफ, भानुदास बंदीछोडे,श्रीकांत बाबशेट्टी,राजेंद्र फुलारी,आप्पासाहेब पाटील,सोसायटीचे सेल्समन हणमंत बाबशेट्टी व पदाधिकारी कार्यकरते उपस्थित होते.   या निवडीचे सूत्रसंचालन मारुती बोडरे,तर आभार राजेंद्र कारभारी यांनी मानले
 
Top