काटी , दि . १६: उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील रहिवासी तथा पुणे येथे वास्तव्यास असलेले जागतिक किक बॉक्सिंग पट्टु जयदेव घनश्याम म्हमाणे यांची याकूत,  रशिया येथे 21 ते 27 जुन या कालावधीत होणाऱ्या  मास रेसलिंग वर्ल्ड चॅपियनशिप स्पर्धेसाठी  भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. 


या स्पर्धेत प्रामुख्याने  सहा खेळाडू 1 प्रशिक्षक व 1ऑफिशिअल, अशा  8 जनांची निवड झाली आहे. या मध्ये-७५ किलो गटात आदित्य बुकी. -८० किलो गटात हेमंत वर्मा कुमावत. -९० किलो गटात जयदेव म्हमाणे .-१०५  आब्दूल शेख.हे सहभागी होणार आहेत. आत्ता पर्यंत यांनी  आनेक जिल्ह, राज्य, व राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत.आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनःश्याम म्हमाणे यानी आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे .सध्या पिंपरी चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन मध्ये या स्पर्धेसाठी सराव करीत आहेत. पुर्ण भारतातून 8 जनाचा संघ 19 जून रोजी मुंबई येथून रवाना होणार आहे तर 28 जुन रोजी मायदेशी परतणार आहे.
 
Top