तुळजापूर ,दि. ११
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगांवकर यांनी शनिवार दि. ११ जून रोजी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले .
यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचेवर यशस्वी शस्त्रक्रिया होण्यासाठी व त्यांना उदंड व निरोगी दिर्घायुष्य लाभावे असे साकडे घातले .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी तर तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने नागेश शितोळे यांनी बाळा नांदगांवकर यांचा सपत्नीक सन्मान केला .
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, विनायक महिंद्रकर, जिल्हासंघटक अमर कदम, जिल्हाध्यक्ष आबा ढवळे, राजेंद्र गपाट, बाळासाहेब कोणावळे ,दादा कांबळे, पाशा शेख, अतुल जाधव, निलेश जाधव, मयुर गाढवे, राहुल बचाटे, धनाजी साठे, गणेश पाटील, आकाश पवार, प्रमोद कदम, वेदकुमार पेंदे, धनंजय मडोळे, अजय डांबरे, वैभव स्वामी, रुपेश स्वामी, किरण कांबळे,जयकुमार घोगरे, हेमंत बनसोडे या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते .