नळदुर्ग , दि. १०

नळदुर्ग शिवारात शुक्रवारी दुपारी पुन्हा एकदा मगरीचे दर्शन झाल्याने शेतकरी व ग्रामस्थात खळबळ उडाली आहे.


मुर्टा  ता.तुळजापूर परिसरात   असलेल्या एका तलावात मगर आढळल्याने परिसरातील शेतकरी  व  नगरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  मुर्टा या शिवारात शुक्रवारी  अशोक जाधव रा. मैलारपूर ता. तुळजापूर  यानी शेतात   नांगर मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी   शेता लगत असलेल्या  तलावाच्या काठावर मगर आल्याचे दिसुन आले.   त्या ठिकाणी तो फिरत  गेला असताना त्याला ती मगर दिसली. ही मगर  अर्धा तासापेक्षा आधिक वेळ तलावाच्या काठावर निवांत पडल्याचे जाधव यानी सांगितले.
 
Top