काटी , दि . १०
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवार दि. 10 रोजी मुस्लिम बांधवानी दुपारची नमाज अदा करुन येथील बसस्थानकावर एकत्रित येऊन नुपूर शर्मां व नवीन जिंदालच्या विरोधात घोषणाबाजी करीत, आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निदर्शने केली.
या आंदोलनात काटीतील मुफ्ती इर्शाद बागवान, माजी ग्रामपंचायत सदस्य करीम बेग, जुबेर शेख, अहमद पठाण, माजीत इनामदार, अमिर पठाण, हाफीज अखिल इनामदार, नजीब काझी, हमीद शेख, मौखिक काझी, इलाई कुरेशी, सद्दाम शेख, युसूफ शेख, शरीफ कुरेशी, गफार शेख यांच्यासह
अनेकजण सहभागी झाले होते.
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा, अशी मागणी आंदोलकांकडून केली गेली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, तलाठी प्रशांत गुळवे यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.