तुळजापूर, दि. २: डॉ.सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मतदार संघात तामलवाडी आणि पंचायत समिती गणांमध्ये वडगाव काटी व केशेगाव या दोन मतदार संघाची वाढ झाली आहे.
त्यामुळे या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 10 व पंचायत समिती साठी 20 जागा निर्माण झाले आहेत. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी तुळजापूर तालुक्यातील जनतेला ही पुनर्रचित करण्यात आलेली माहिती प्रसिद्धीस दिली असून या संदर्भातील हरकती 8 जून पर्यंत मागविण्यात आल्या आहेत.
तुळजापूर तालुक्यामध्ये यापूर्वी जिल्हा परिषदेचे नऊ मतदार संघ होते. यामध्ये काक्रंबा, नंदगाव, खुदावाडी, वडगाव काटी , मंगरूळ, अणदूर, जळकोट, सिंदफळ हे असून पुनर्रचनेनंतर तामलवाडी मतदारसंघ निर्माण झाला आहे. पंचायत समितीच्या एकूण 18 या तालुक्यात असून पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढले आहे. त्यामुळे नवीन पुनर्रचना झाल्यानंतर तालुक्यात अपसिंगा, सिंदफळ, काक्रंबा, जळकोट, किलज, सलगरा दिवटी, अणदुर, मंगरूळ,आरळी बुद्रुक, सावरगाव ,वडगाव काटी, तामलवाडी, काटगाव, येवती, केशेगाव, हंगरगा नळ , नंदगाव व चिवरी या मतदारसंघाचा समावेश झालेला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी मतदारसंघाची पुनर्रचना जाहीर केली असून या अनुषंगाने ८ जून पर्यंत हरकती देण्याचे आवाहन केले आहे.