काटी, दि . ०२

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी बाळुबाई येडबा उबाळे यांचे बुधवार दि. 1 जुन रोजी अल्पशा आजाराने मोहोळ येथील राहत्या घरी रात्री दहा वाजता  निधन झाले. त्या मोटरसायकल मॅकॅनिक तथा  शिवसैनिक संतोष उबाळे यांच्या मातोश्री होत.
      

त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता मोहोळ येथील पुणे रोडवरील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top