मुरूम, दि. ७ :
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने व्हॅल्यू अड्डेड कोर्सेच्या प्रमाणपत्राचे वितरण मंगळवारी (ता.७) रोजी करण्यात आले.
रसायनशास्त्र विभागाकडून बीएस्सी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर अँप्लिकेशन्स इन केमिट्री हा कोर्स चालविला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात या कोर्से साठी २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १९ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या कोर्से पूर्ण केला. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर, आदर्श महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शौकत पटेल यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर, डॉ. महेश मोटे, डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. रवि आळंगे आदींची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्रा. किरण सगर यांचा प्राचार्य अशोक सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कोर्सेचे संयोजक म्हणून डॉ. सुशील मठपती यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन राजमाने यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार डॉ. सुजित मठकरी यांनी मानले.