काटी , दि . ७ : उमाजी गायकवाड
काटी ता. तुळजापूर येथिल ग्रामपंचायतीचा कार्यकाल येत्या ऑक्टोबर महिन्यात संपणार असून पुढील निवडणुकीसाठी सोमवार दि. 6 जून रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले.
काटी ग्रामपंचायतमध्ये एकूण 15 सदस्य संख्या असुन 5 हजार 347 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विविध निवडणुकीत या गावाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून महसूल विभागातर्फे मंडळ अधिकारी ए.आर. यादव व सहाय्यक म्हणुन तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेविक लक्ष्मीकांत सुरवसे हे होते.
काटी येथे वार्डरचनेत व सदस्य संख्येमध्ये कुठलाही बदल झालेला नसून यापूर्वीही पाच वार्ड आणि एकूण सदस्य संख्या 15 होती ती तशीच राहिली आहे. एकूण 5,347 मतदार असून, वार्ड 1 मध्ये आरक्षण सर्वसाधारण महिला 1 सर्वसाधारण 2, वार्ड 2 मध्ये एससी महीला 1, सर्वसाधारण महिला 1, सर्वसाधारण 1, वार्ड 3 मध्ये सर्वसाधारण स्त्री 2, सर्वसाधारण 1, वार्ड 4 मध्ये एससी महिला 1, सर्वसाधारण महिला 1, सर्वसाधारण 1,आणि वार्ड 5 मध्ये सर्वसाधारण महिला 1, एससी महिला 1, सर्वसाधारण 1,असे आरक्षण जाहीर झाले असून मंगळवारी यावर कोणाचा आक्षेप असेल तर आक्षेप नोंदवला जाऊ शकतो.
आरक्षण सोडत प्रसंगी सरपंच आदेश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, मंडळ अधिकारी ए.आर. यादव, तलाठी, प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, प्रदीप साळुंके,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, सुजित हंगरगेकर,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, अनिल गुंड, अतुल सराफ, करीम बेग, ग्रा.प. मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, जितेंद्र गुंड, सदस्य अनिल बनसोडे, संजय महापुरे, सतिश देशमुख, रामेश्वर लाडुळकर, शिवसेनेचे सयाजीराव देशमुख,अहमद पठाण, अविनाश देशमुख, सिकंदर कुरेशी,यांच्यासह नागरिक उपस्थित होते.