काटी , दि . ७
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत कार्यालयात श्रीमंतराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जुन हा राज्यभिषेक दिन हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुनअभिवादन करण्यात आले.
यंदा प्रथमच राज्य शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत समोर भगवी जरीचा पताका असलेला भगवा स्वराज्यध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन,जगदंब तलवार, शिवमुद्रा,वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत केलेली स्वराज्यगुढी उभा करून जय भवानी, जय शिवाजी या जयघोषात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सरपंच आदेश कोळी, प्रदीप साळुंके, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, तलाठी प्रशांत गुळवे, सुजित हंगरगेकर, मकरंद देशमुख, अनिल गुंड, अशोक जाधव, जितेंद्र गुंड, सतिश देशमुख, अनिल बनसोडे, संजय महापुरे, रामेश्वर लाडुळकर, अतुल सराफ, प्रकाश गाटे,श्रावण वाघमारे, संजय साळुंके, रामदास देवकर, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले, अनिल गोविंद बनसोडे, सुहास शिंदे आदीसह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.