चिवरी , दि . ७
तुळजापूर तालुक्यातील येवती येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,६ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत गायन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी सरपंच सौ. पूजा अमोल गवळी, उपसरपंच प्रीतम गायकवाड, तुळजापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष समाधान ढोले, ग्रामपंचायत सदस्य राम शिंदे, यशवंत बडूरे, गोरख तांबे, काका शिंदे, भगवान बडूरे, समाधान कुंभार, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब शिंदे, विक्रम गवळी, अशोक गायकवाड, किरण शिंदे, सोनू तांबे, संकेत हजारे ,शुभम ढोले, आदीसह ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होत.