वागदरी , दि. ०४ एस.के. गायकवाड:
मल्लिकार्जुन गुरव समाज मंडळाच्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथे सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वाढत्या महागाईच्या काळात ग्रामीण भागात वैयक्तिक पातळीवर एखाद्या कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे मोठी आर्थिक ओढाताण करावी लागते.वाढत्या महागाईवर पर्याय म्हणून वागदरी ता.तुळजापूर येथील मल्लिकार्जुन गुरव समाज मंडळाच्या वतीने काळाची गरज ओळखून व समाजातील ऋणानूबंध वाढून सर्वांना वैदिक धर्माची जाणीव व्हावी, या उदात्त हेतूने वागदरी येथील जून्या हेमाडपंथी मल्लिकार्जुन महादेव मंदिरात सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी २४ मुलांवर उपनयन संस्कार (बटू) करण्यात आले. यानिमित्ताने होमहवनासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटी महप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रा.प.सदस्य महादेव बिराजदार,बळीराम बिराजदार,प्रा.डॉ. गणेश बिराजदार,पोलीस पाटील बाबुराव बिरादार,बालाजी बिराजदार,कृषी परिवेक्षक धन्यकुमार बिराजदार,रामचंद्र बिराजदार,जितेंद्र बिराजदार(पाटील),राजेंद्र बिराजदारसह महिला,ग्रामस्थ उपस्थित होते.