तुळजापूर , दि . ०१
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, वडगाव लाख, होनाळा, काक्रंबावाडी आदी गावातील २१० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व मोफत औषध उपचार करण्यात आले. आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. अभयसिंह घोलकर व
डॉ. रेश्मा घोलकर यांनी बालकांची तपासणी केली.
शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने काक्रंबा, वडगाव लाख, होनाळा, काक्रंबावाडी आदी गावातील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी जंतनाशक औषधे, मल्टीव्हिटॅमिन्स, लोहवर्धक टॉनिक, प्रोटीन पावडर व संसर्गजन्य आजारावरील औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. सकाळी ०९ ते दुपारी ०१ या कालावधीत चाललेल्या या शिबिरात २१० बालकांची तपासणी करण्यात आली.
यावेळी बालाजी बंडगर, अनिल बंडगर,
यमगरवाडी सामाजिक उत्थान प्रकल्पाचे सचिव गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष कोळेकर, उद्योजक पाटील यांचासह आशीर्वाद हॉस्पिटलचे स्टाफ, ग्रामस्थ उपस्थित होते.
आपसिंगा परिसरात ३३० रूग्णांची तपासणी
आशिर्वाद हाॅस्पिटलच्या वतीने यापूर्वी तालुक्यातील आपसिंगा, कात्री, कामठा परिसरात ३३० रूग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले होते. तर या पुढील काळात तालुक्यातील इटकळ परिसरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे डाॅ. अभयसिंह घोलकर यांनी सांगितले.