काटी, दि .०१
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी सुभाष भागवतराव साळुंके यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन रविवार रोजी आपचे जिल्हा सचिव मुन्ना शेख, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भुतेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
सुभाष साळुंके यांनी आप पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ काटी येथे मंगळवार दि. 31 रोजी सकाळी 9:30 वाजता येथील दत्त मंदीरात प्रकाश गाटे, माजी सैनिक संतोष थिटे, अमर गाटे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रकाश गाटे, अमर गाटे, माजी सैनिक संतोष थिटे,रामेश्वर लाडुळकर,सचिन इंगळे, अर्जुन बामणकर, श्रावण वाघमारे, अरविंद ताटे, सुनिल गायकवाड, मोहन शिंदे, हणमंत हागरे आदी मान्यवर उपस्थित होते.