नळदुर्ग ,दि .०१

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमदार राणाजगजीतसिंह पाटील  यांची मनसे शहराध्यक्ष व शहर सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी भेट घेऊन नळदुर्ग येथील महामार्ग पोलिस केंद्रास रुग्णवाहिका व क्रेन  आमदार निधीतुन उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी निवेदन दिले.


निवेदनात मनसेने असे नमूद केले आहे की,सोलापुर-हैदराबाद हा महामार्ग नळदुर्ग शहरातून गेला आहे,शहराच्या बाहेरुन बायपास रस्त्याचे काम अर्धवट असल्याने अवजड वाहतूक ही शहरातून जात आहे,यामुळे नळदुर्ग घाट ते जळकोट येथे आतापर्यंत अनेक मोठे अपघात झाले आहेत,जखमीना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिका मिळत नाही,तसेच अपघात झालेले अवजड वाहतूक करणारे वाहने महामार्गावरुन हटविन्यासाठी बाहेरुन(टोल) क्रेन मागावे लागत आहे,क्रेन अपघात स्थळी येईपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊन वाहनाच्या रांगा लागत आहे, ३ते४ कि.मि अशा रांगा असल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन याचा अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,म्हणूनच या घटनेचे गांभीर्य पाहता,महामार्ग पोलिस केंद्राकड़े स्वतंत्र रुग्णवाहिका व क्रेन असणे गरजेचे झाले आहे,त्यासाठी आपल्या आमदार निधीतुन रुग्णवाहिका व क्रेन संबधित विभागास उपलब्ध करून द्यावे असे निवेदन दिले आहे,

निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सचिव प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top