चिवरी , दि . ०१  राजगुरु साखरे: 

मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल आणि शेती कामाची लगबग वाढली असताना खते व बियाण्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 


यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे सध्या खत बियाण्यासाठी  बाजारात शेतकरी विचारपूस करीत आहेत. पण बाजारात खत व बियाण्याचे भाव वाढले असल्यामुळे बाजारातून महागडे बियाणे खरेदी करण्यापेक्षा सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरलेले बरे असे शेतकरी म्हणत आहेत. बाजारातील महागड्या बियाण्यापेक्षा घरगुती बियांनाकडे शेतकऱ्याचा कल वाढलेला दिसून येत आहे. 

तुळजापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतात, मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील  शेतकरी सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. याच बरोबर बाजरी, तूर मूग उडीद मका असे तुरळक पीक घेतले जातात. बहुतांश शेतकरी सर्वाधिक सोयाबीन बियाणे बाजारातून खरेदी केली जातात,तर घरगुती तूर, मूग उडीद मका  या बियाणाचा वापर केला जातो. गतवर्षी बहुतांश शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे यंदा तालुक्यात अत्यल्प शेतकऱ्याकडे सोयाबीनचे घरगुती  उपलब्ध असल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव बाजारातील सोयाबीन खरेदी करताना दिसत आहे, सध्या शेतकरी खत  बियाण्यासाठी बाजारात चौकशी करत आहेत, बाजारातील सोयाबीन बियाणे गतवर्षी१०० ते ११०रुपये किलो प्रमाणे होते यंदा मात्र ते १८० ते २०० रुपये  आहे. असे कृषी दुकानदार सांगत आहेत तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा रासायनिक खताच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना शॉक बसला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे . तर सर्वाधिक मागणी असलेला डीएपी खत चौदाशे रुपये ते  पंधराशे रुपये इतका झाला आहे. तसेच रासायनिक खतांच्या दरवाढी मध्ये युरिया वगळता सर्व खताच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. 

एकंदरीत बाजारातील अव्वाच्या सव्वा रुपये खर्च करून बियाणे घेण्यापेक्षा शेतकरी घरगुती बियाणाचा शोध घेत आहेत. केवळ भाववाढीमुळे घरगुती बियाण्याचा वापर करणार असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे.
 
Top