नळदुर्ग ,दि . ०१

विविध मागण्यासाठी महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे नळदुर्ग  नगरपालिकेस  निवेदन देवुन  मागणीची पुर्तता न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. 


अनेक वर्षापासून शासकीय जागेवर राहत असलेल्या कुटुंबाना मालकी हक्काचे उतारे (८अ) देऊन घरकुल योजनेचा लाभ द्यावा,तसेच शहरात अनेक भागात ६  ते ८ दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे,नागरिक जर ३६५ दिवसांची नळपट्टी भरत असतील तर पाणी पुरवठा ही त्याला साजेसा ठरेल असा करावा,त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने व मागील काही घटनेचा आढावा घेऊन आवश्यक त्या शहरातील प्रमुख बाजारपेठा,मुख्य ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावेत व तसेच हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानाचे विकासकाम व सुशोभीकरण काही महिन्यापूर्वी करण्यासाठी सुरुवात केली होती,पण या ठिकाणी ही माशी शिंकली असून ठेकेदार अदृश्य झाला आहे,परंतु या सर्व भाकड कथेशी सामान्य नागरिकांना काही ही देणे घेणे नाही!लहान मुले,जेष्ठ नागरिक यांचा विचार करून या उद्यानाचे सुभोभिकरण तात्काळ सुरु करावे,या सर्व मागण्याचा गांभीर्याने विचार करून पालिकेने ठोस पावले उचलावीत जेणे करून आम्हाला मनसे स्टाईल आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,असा इशाराच पालिकेचे मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात दिला आहे.


निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top