वागदरी , दि . ०१ : एस.के.गायकवाड :
दि.१ जुलै जागतिक डॉक्टर डे दिना निमित्ताने नळदुर्ग येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) व भाजपा कार्यकर्त्यांंच्या वतीने डॉक्टरांचा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के गायकवाड म्हणाले की, कोरोना सारख्या विविध आजारावर योग्य उपचार करून रुग्णांना जीवदान देवून त्याचे आयुष्य वाढविणारे डॉक्टर हेच खरे देव आहेत. तेंव्हा आजारावर योग्य उपचार करण्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल जानरावसह आरोग्य परिचारिका एम.टी. होगले, सी.एम.मस्तुद,एम.एन.म्हमाने,आरोग्य कर्मचारी एल.आर.पवार, ए.के.कलशेट्टी,अतुल सगरे आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, तालुका सचिव चंद्रकांत दुपारगुडे,तालुका संघटक सुरेश लोंढे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशीद कुरेशी, भाजपा मेडिया विभाग तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बापू बनसोडे, सुरेश बनसोडे,राजु देवणाळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.