नळदुर्ग, दि . १७ : 

 बंधन सामाजिक संस्था ही निराधार महिला व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनविन्याच्या उद्देशाने कार्य करत आहे,या सामाजिक संस्थेस मोठ्या कंपन्यानी सीएसआर फंडातुन आर्थिक देणगी देत अशा महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन म्हणून थेट मदत करत आहेत.


नळदुर्ग शहर व परिसरातील   निराधार व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील महिलांना बंधन सामाजिक संस्थेच्या वतीने शिलाई मशीन,पीठाची गिरणी,किराणा स्टॉल,कपडयाचे दुकान आदिचे मोफत वितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी फुलवाड़ी ता. तुळजापूर येथिल सरपंच चद्रकांत लोहार, उपसरपंच राजेंद्र धबाले,पत्रकार शिवाजी नाईक,अजित चव्हाण, शाखा व्यवस्थापक  उत्पाल घोष ,  समन्वयक फारूक अहमद, ब्रांच सी.ओ विजयकुमार स्वामी,अनिल पार्गी,ब्रांच इंचार्ज राजीव मंडल,अनिल मेघवाल यांच्यासह लाभार्थी महिला व  नागरिक  उपस्थित होते.

 
Top