काटी, दि . २८ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे बुधवारी सोलापूर -तुळजापूर रोडवर हॉटेल पंचरत्न शेजारी 3:30 वाजनेच्या सुमारास जवळपास 10 ते 12 वानरांचा कळप रस्ता ओलांडत असताना त्यापैकी एका वानरास अचानकपणे अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत वानराचा जागीच मृत्यू झाला.
हे दृश्य हॉटेल चालक संतोष भोसले यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ गावातील भाजपचे कार्यकर्ते गजानन वडणे, संग्राम वडणे, यशवंत भोसले यांना या घटनेची माहिती दिली. गावातही याबाबत माहिती समजताच या घटस्थाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी वनकर्मचारी यांना पण याची माहिती दिली. ही घटना भोसले यांच्या शेतासमोर झाल्याने या मृत वानरावर माळुंब्रा येथील भजनी मंडळ, ग्रामस्थ, महिला यांच्या उपस्थितीत प्रति हनुमानाचे रुप समजून टाळमृदंगाच्या गजारात विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी हनुमान मंदिर बांधण्याचा संकल्प केला.