काटी, दि . ११
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदार केरबा सलगर यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशांन्वये सलगर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. त्यानिमित्त तामलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवार दि.11 रोजी सत्कार करण्यात आले .
यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत यांच्या हस्ते पदोन्नती झालेले पोलीस उपनिरीक्षक केरबा सलगर यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले.