तुळजापूर, दि. १२
आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुळजापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सामुदायिक गीतापठणाचा धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरांमध्ये दर एकादशी निमित्ताने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये गीता पठण केले जाते, आषाढी एकादशी निमित्त सामुदायिक गीतापठणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी स्थानिक महिला वर्गांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. गीता परिवारातील गीतेच्या अभ्यासक अश्विनी अनंत कोंडो यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
येथील स्थानिक महिला वर्गामधून सौ. सुवर्णमाला पाटील, सौ. मीना भिरगे, सौ. शोभा घुगे, सौ. उर्मिला महामुनी, सौ. मीरा घोगरे, सौ. उज्वला कुतवल, सौ मनीषा प्रयाग, सौ. लीला कवठेकर, सौ. भाग्यश्री मलबा, सौ. रंदन मलबा, सौ. मुक्ता पाठक, सौ. अनुराधा पाटील, सौ. उज्वला पाटील, सौ. रंजना पाटील, सौ सुवर्ण चाटूफळे, सौ संजीवनी प्रयाग, सौ रंजना पाठक, सौ संगीता प्रयाग, सौ विद्या कोंङो, सौ अंजली लहाने यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर या सर्व महिलांनी गीतेचे १८ अध्याय वाचन केले आणि त्यानंतर विष्णुसहस्त्रनाम पठण करण्यात आले. अत्यंत उत्साहामध्ये दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होवुन पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.