काटी , दि . १२

  काटी ते तुळजापूर रस्त्यावर नागोबा मंदीरापासून  अर्धा किलोमीटर अंतरावर पावसामुळे मोठ  मोठे भगदाड पडले आहे. ऐन पावसाळ्यातच पडलेल्या या दिड  ते दोन फुटांच्या भगदाडामुळे व पावसाच्या पाण्यामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची
शक्यता वर्तवली जात आहे.


  काटी ते तुळजापूर  या रस्त्यावर कायमच वाहनांची चांगली वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावरच हे भगदाड पडले असून, स्थानिक नागरिकांनी त्याभोवती दगड ठेवल्याने दिवसा ते वाहनचालकांच्या लक्षात येत आहे. मात्र, रात्री या रस्त्यावर भगदाड पडल्याचे लक्षातच येत नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन अपघात घडण्याअगोदर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
 
Top