नळदुर्ग दि . १२
खडतर परिश्रम , जिद्द , आत्मविश्वास याच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून एक प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी यशस्वी प्रवास करणारे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब महाबोले यांचे कार्य हे प्रेरणादायी व अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे आयोजित बाळासाहेब महाबोले यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
नळदुर्ग येथील रहिवासी असलेले व उमरगा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बाळासाहेब सिताराम महाबोले यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सेवापूर्ती गौरव समारंभ निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण माजी नगराध्यक्ष नितीन कासार , माजी नगरसेवक बसवराज धरणे , कमलाकर चव्हाण ,संजय बताले महेंद्र कावरे, सरदारसिंग ठाकूर , समीर सुरवसे , बलभीम मुळे , सुभाष महाबोले, नाभिक समाजाचे नेते लक्ष्मण धाकतोडे , माजी विस्तार अधिकारी शिवाजी सुरवसे , पांडुरंग पुदाले , श्रमिक पोतदार ,एस. के. गायकवाड , आदींची प्रमुख उपस्थिती होती .
तुळजापूर तालुक्यातील खानापूर सह विविध ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून शैक्षणिक कार्य करीत असताना दरम्यानच्या काळात त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून उमरगा गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पदोन्नती झाली आणि नियत वयोमानानुसार तब्बल 38 वर्षे सहा महिने सेवा पूर्ण करीत ते सेवानिवृत्त झाले. याबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व महाबोले मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभात मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते बाळासाहेब महाबोले यांना मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला .
त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नौकरी केली त्या त्या ठिकाणचे नागरिक व अनेक विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी महाबोले यांच्या मातोश्री ग. भा.रुक्मिणीबाई महाबोले यांची साखरतुला करण्यात आली. नळदुर्ग शहरातील सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी कमलाकर चव्हाण, महेंद्र कावरे , बलभीम मुळे , संजय बताले आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमासाठी राजेंद्र महाबोले , हरिदास महाबोले , बालाजी सुरवसे ,सुजित सुरवसे , सुशील सुरवसे ,शिवराम महाबोले ,राम सोमवसे , सहदेव माने ,सचिन सुरवसे आदींनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुर महाबोले यांनी मानले.