नळदुर्ग , दि . ०५

वृक्षारोपण  करण्याबरोबरच वृक्षसंवर्धन करुन  झाड वाढविले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येकानी किमान आपल्यासाठी तरी झाड लावले पाहिजे  असे मत तुळजापुर  तहसिलदार सौदागर तांदळे यांनी नळदुर्ग येथे आयोजित  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने  वृक्ष लागवड कार्यक्रमात बोलतांना व्यक्त  केले.
        

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने दि.५ जुलै रोजी नळदुर्ग शहरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे.  तहसिलदार सौदागर तांदळे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 


यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे बोलताना पुढे म्हणाले की , कोरोना काळात सर्वानाचा प्राणवायु व झाडाचे  महत्त्व  कळले आहे. भविष्यात प्राणवायुची समस्या उदभवु नये याकरिता प्रत्येकानी वृक्ष लागवड करणे गरजेचे आसल्याचे सांगून   पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. समितीच्या सर्व सदस्या व मिञ परिवाराचे त्यानी कौतुक करुन शुभेच्छा  दिल्या. 


यावेळी माजी नगरसेवक शहेबाज काझी यानी या वृक्षारोपण कार्याचे कौतुक करुन  सविस्तर माहिती सांगितले. 

याप्रसंगी उदय जगदाळे, बसवराज धरणे, विनायक अहंकारी सुधीर हजारे, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण,  भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, भाजपाचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, अजहर जहागिरदार सागर हजारे, बंडप्पा कसेकर, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड,सतीश पुदाले,गणेश मोरडे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे,पत्रकार शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, भगवंत सुरवसे, आयुब शेख, दादासाहेब बनसोडे आदीजण उपस्थित होते.
         

प्रारंभी तहसिलदार सौदागर तांदळे व न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने समितीचे विलास येडगे, पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, सुहास येडगे, प्रभाकर घोडके, अमर भाळे,महेश घोडके व गजानन हळदे यांनी सत्कार केला.
       
  
      
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी करतांना समितीने गेल्या आठ वर्षात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पत्रकार तानाजी जाधव यांनी मानले.
 
Top