तुळजापूर दि .०५
तुळजापूर तीर्थक्षेत्राचा तुळजापूर विकास प्राधिकरणांमधून विकास झाल्यानंतर बुधवार पेठ आणि आठवडा बाजार या परिसराचा विकास झालेला नसल्यामुळे परिसरातील या भागातील मागण्यांचे निवेदन नगरपालिकेला सादर केले आहे. या विकास प्रश्नांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी या शिष्टमंडळाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे
तुळजापूर येथील शुक्रवार पेठ भागातील अनेक समस्या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद नातू यांना पुढील विषयावर निवेदन देण्यात आले. आठवडा बाजार रेस्ट हाऊस दुरुस्ती करावे, येथे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, मंदिर समोरील अनावश्यक पायऱ्या काढाव्यात, हॉटेल राज पॅलेस ते आठवडा बाजार कडील रोड लाईट दुरुस्ती व नवीन बसवावे, 124 भक्त निवास भाविकांसाठी लवकर सुरू करावे, परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलने व कचरा कुंडीची व्यवस्था करावी या मागण्यांचे निवेदन याप्रसंगी शिष्टमंडळाने दिले आहे
यावेळी सज्जन साळुंके,माऊली भोसले,किशोर साठे,शशिकांत नवले,बाळासाहेब भोसले,धीरज जाधव,शांताराम पेंदे,नागेश साळुंके,विजयकुमार नवले,अनिल गव्हाड,उदय भोसले,सुजित शिंदे, दत्ता क्षीरसागर,लखन पेंदे,अण्णासाहेब क्षीरसागर,नानासाहेब पेंदे, बाबासाहेब शेळके, राजाभाऊ अमृतराव, बाळासाहेब पेंदे, आकाश चोपदार,सोमनाथ अमृतराव,अमोल गायकवाड, चेतन शेळके, भाऊ कदम,हरिभाऊ चव्हाण,गणेश साळुंके,संजय भोसले,संजय गायकवाड,श्रीकृष्ण साळुंखे,धन्यकुमार मस्के,दादा साळुंके, सुदर्शन झाडपीडे,रत्नदिप भोसले,सागर गंगणे,अमर झाडपीडे,आप्पा चोपदार, चंद्रकांत जाधव,पंकज पेंदे,अक्षय करडे,देवेंद्र झाडपीडे,अक्षय पेंदे,शुभम क्षिरसागर,हनुमंत पेंदे, सोमनाथ गाडे, नितीन चव्हाण,उदय भोसले,विक्रांत नवले,सयाजी चव्हाण,जयराज भोसले,करण साळुंके,खंडु कदम व पुजारी बांधव युवक मोठया संख्येने उपस्थित होते.